Lok Sabha Election 2024 – कंगनाविरोधात मैदानात उतरणार विक्रमादित्य सिंह?

हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघ यंदा चर्चेत आला आहे. भाजपने या मतदारंसघातून अभिनेत्री कंगना राणावतला उमेदवारी दिली आहे. कंगनाची उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसने तिच्यावर सडकून टीका केली होती. हिमाचल प्रदेशच्या मंडीमधील जनता संकटात असतना कंगना कोठे होती, तसेच ती निवडणूक लढवत असली तरी जिंकल्यानंतर ती मंडीतच राहणार आहे का, की जनतेने त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मुंबईला धाव घ्यायची, असा हल्लाबोल काँग्रेसने केला होता.

हिमाचल प्रदेशच्या मंडीमधून काँग्रेसकडून कोण उमेदवार असेल याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, काँग्रेस कंगनाविरोधात आक्रमक भूमिका घेत आहे. त्यामुळे कंगानाविरोधात मैदानात कोण उतरणार याबाबत उत्सुकता आहे. हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस अध्यक्ष प्रतिभा सिंह यांनी मंडीमधून विक्रमादित्य सिंह निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, अद्याप पक्षाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू यांनीही याबाबतचे संकेत दिले आहे. मंडी येथून आम्हाला युवा नेतृत्व मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच कंगनाविरोधात लढण्यासाठी ते सशक्त उमेदवार मानले जात आहेत. सध्या मंडी येथून प्रतिभा सिंह या खासदार आहेत. मंडी येथील जनता आमच्यासोबत आहे. त्यामुळे यंदा ही जागाही आम्हीच जिंकणार, असे प्रतिभा सिंह यांनी सांगितले. आता काँग्रेसकडूनही विक्रमादित्य यांच्या नावाची घोणा झाल्यास कंगना आणि विक्रमादित अशी चुरशीची लढत होणार आहे.