
1 नोव्हेंबर 2025 पासून दिल्लीत बीएस-6 नियमांचे पालन न करणाऱ्या सर्व व्यावसायिक मालवाहू गाड्यांना प्रवेश पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशनने दिल्लीच्या सीमेवर बीएस-6 मानक असलेल्या गाड्यांव्यतिरिक्त इतर सर्व व्यावसायिक ट्रक्सच्या प्रवेशावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशनच्या आदेशानुसार, दिल्लीबाहेर नोंदणीकृत असलेल्या आणि बीएस-6 मानकांचे पालन न करणाऱ्या गाड्या, जसे की जुने डिझेल ट्रक आणि बीएस-6 पेक्षा कमी दर्जाच्या गाड्या आता दिल्लीत येऊ शकणार नाहीत. या गाड्या प्रदूषणाचे मोठे कारण मानल्या जातात आणि हिवाळ्यात जेव्हा धुके वाढते, तेव्हा हवा आणखी खराब होते.
कोणत्या गाड्यांना प्रवेशाची सूट
सर्व वाहनांवर बंदी घालण्यात आलेली नाही. दिल्लीत नोंदणीकृत असलेल्या बीएस-6 प्रमाणित गाड्या, सीएसजी, एलएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रवेशाची परवानगी आहे. याशिवाय बीएस-4 व्यावसायिक 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे. म्हणजेच पुढील एक वर्षासाठी या गाड्या दिल्लीत ये-जा करू शकतील.




























































