जिवंत रहायचे असेल तर 500 कोटी द्या, दरोडोखोरांकडून महिला न्यायाधीशांना धमकीचं पत्र

पैशांसाठी थेट न्यायाधीशांनाच धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. जिवंत रहायचे असेल पैसे द्यावे लागतील असे सांगत दरोडेखोरांनी महिला न्यायाधीशांकडून 500 कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. दरोडेखोरांनी प्रथम दिवाणी न्यायाधीश मोहिनी भदौरिया यांना पत्राद्वारे धमकी दिली आहे. याप्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत.

मध्य प्रदेशातील रेवा येथे ही धक्कादायक घटना समोर आली आहे. एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रेवा येथील ट्योंथर न्यायालयात तैनात असलेल्या प्रथम दिवाणी न्यायाधीश मोहिनी भदोरिया यांना दरोडेखोरांनी धमकीचे पत्र पाठवले. पत्र पाठवणाऱ्याने स्वतःला कुख्यात दरोडेखोर हनुमान टोळीचा सदस्य असल्याचे सांगितले आहे.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून स्पीड पोस्टद्वारे हे धमकीचे पत्र पाठवण्यात आले आहे. पत्रात न्यायाधीशांना इशारा देण्यात आला आहे. जर तुम्हाला जिवंत राहायचे असेल तर तुम्हाला पैसे द्यावे लागतील. तसेच, 1 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7.45 वाजता उत्तर प्रदेशातील बडगढ जंगलात पैसे पोहोचवावेत, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे पत्रात लिहिले आहे.

न्यायाधीश भदोरिया यांनी तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. रेवाचे पोलीस अधीक्षक विवेक सिंह यांनी तातडीने एक विशेष तपास पथक तयार करून उत्तर प्रदेशला पाठवले.