‘एक रुपयात बूट’च्या ऑफरमुळे चेंगराचेंगरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महागडे बूट फक्त एक रुपयात देणार, या अजब ऑफरमुळे केरळच्या कोझिकोडमध्ये रविवारी एकच गोंधळ उडाला. दुकानाच्या बाहेर मोठी गर्दी जमली. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. याप्रकरणी पोलिसांनी दुकान मालकाला अटक केली.

ब्रॅण्डेट बूट एक रुपयात देणार अशी जाहिरात सोशल मीडियावर करण्यात आली होती. पहिल्या 100 ग्राहकांसाठी ही ऑफर होती. जाहिरात बघून शेकडो लोक दुकानात आले. मध्यरात्री 2 वाजल्यापासूनच दुकानाबाहेर लोक जमू लागले. अगदी वायनाडमधूनही लोक पोचले. यामध्ये लहान मुलांचाही समावेश होता. त्यामुळे दुकानाबाहेर एकच गदारोळ उडला.