लग्नासाठी साडी, सोने, 2500 रुपये आणि बरंच काही…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तमिळगा वेत्री कळघम अर्थात ‘टीव्हीके’ पक्षाचे सर्वेसर्वा विजय यांनी महिलांसाठी अनेक आश्वासने दिली. यात त्यांचा पक्ष सत्तेत आला तर 2500 रुपये मासिक आर्थिक मदत, तरुणींना लग्नासाठी रेशमी साडीसह सोने आणि सर्व कुटुंबांसाठी सहा घरगुती सिलिंडर मोफत देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले आहे. तामीळनाडूत येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणूक होणार आहे. ममल्लापुरम येथे ‘टीव्हीके’तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा कार्यक्रम झाला. यात विजय यांनी मतदारांशी संवाद साधला. ‘टीव्हीके’ सत्तेत आल्यावर 60 वर्षांपर्यंतच्या सरकारी कर्मचाऱ्यांशिवाय सर्व महिलांना मासिक मदत दिली जाईल, असे सांगितले.