चाळिशीतल्या खट्याळांची कहाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

रंगभूमीवर नेहमीच विविधांगी विषयांवर आधारित आशयघन नाटकं येत असतात. त्यातील काही दैनंदिन जीवनाशी निगडित असतात, तर काही नाटकं काहीशी खटय़ाळ असतात. रंगभूमीवर नुकतंच आलेलं ‘नॉटी 4टी’ हे नाटक अशाच खटय़ाळांची कथा सांगणारं आहे. वाह रंग! प्रॉडक्शन्स निर्मित आणि चंद्रवलय प्रकाशित ‘नॉटी 4टी ’ या नाटकाची निर्मिती अविनाश वारंग यांनी केली आहे.

संकल्पना वंदना राणे-जोगी यांची असून त्या या नाटकाच्या सहनिर्मात्याही आहेत. वाशी येथील विष्णूदास भावे नाटय़गृहात शुभारंभाचा प्रयोग झाल्यानंतर ‘नॉटी 4टी’ची टिम महाराष्ट्राच्या कानाकोप-यात नाटकाचे प्रयोग करण्यासाठी सज्ज झाली आहे. मुकुंद महाले आणि अविनाश वारंग यांनी लिहिलेल्या या नाटकाचं दिग्दर्शन सुनील परब यांनी केलं आहे. या नाटकाची कथा कोणत्याही काळात घडणारी असल्याचं सुनील परब यांनी सांगितले. वंदना राणे-जोगी, अविनाश वारंग, स्नेहा जोशी, चंद्रशेखर पांचाळ, नितीन सुरेश, सुधीर श्रीधर आणि संजीव धुरी यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. सचिन वारीक यांनी नेपथ्य केलं असून, प्रकाशयोजना मोहन आगवाने यांची आहे. संगीतकार रूपेश दुदम यांचे आहे.