‘वायरल फ्रायडे’मध्ये नवीन प्रभाकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘पैचान कौन?’ या प्रश्नामुळे लोकप्रिय झालेला स्टँडअप कॉमेडीयन नवीन प्रभाकर ‘वायरल फ्रायडे’ या शोमधून सूत्रसंचालकाच्या भूमिकेतून आपल्यासमोर येणार आहे. हा शो पूर्णपणे सिनेमाला वाहिलेला आहे.

‘वायरल फ्रायडे’मधून असेच मनाच्या कोपऱयात घर करून राहिलेले सिनेमे आपल्या भेटीस येणार आहेत. नवीन प्रभाकर या शोच्या माध्यमातून संस्मरणीय सिनेमांच्या आठवणींची पोतडी त्याच्या अनोख्या स्टाईलमध्ये आपल्यासमोर उलगडणार आहे.

सिनेमातील काही गाजलेल्या डायलॉग्जची मिमिक्री, संस्मरणीय सिनेमातील लोकप्रिय कलाकारांना सिनेमा आणि त्यातील भूमिकेविषयीच्या आठवणींना उजाळा देत बोलते करणे आणि शेवटी दैनंदिन घडामोडींवर भाष्य करणारी एखादी पाच मिनिटांची स्टँडअप कॉमेडी असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. अभिनेत्री सारा श्रवण निर्मित या शोचे लेखन विनोद गायकरने केले आहे. हा शो ‘हंगामा’ आणि ‘मूव्ही मॅक्स’वर या ओटीटीवर पाहता येईल.