
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे काँग्रेसचे नेते आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंह सिद्धू पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी अमेठी लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाले तर राजकारण सोडून देईल असा पण सिद्धू यांनी केला आहे. तसेच सोनिया गांधी यांच्याकडून राष्ट्रवाद शिकण्याची गरज आहे, असा सल्लाही त्यांनी लोकांना दिला.
#LokSabhaElections2019 | I will quit politics if @RahulGandhi loses in Amethi: Navjot Singh Sidhu (@sherryontopp)
https://t.co/e6NMd0EMNK#ElectionsWithHT pic.twitter.com/0bVeObo6he— Hindustan Times (@htTweets) April 29, 2019
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी नवज्योत सिंह सिद्ध यांनी रायबरेलीमध्ये बोलताना भाजप सरकारवर निशाणा साधला. या दरम्यान त्यांनी गेल्या 70 वर्षात कोणताही विकास झाला नाही हा भाजपचा मुद्दाही फेटाळून लावला. काँग्रेसने या देशाला सुईपासून विमानापर्यंत सर्व काही दिल्याचे सिद्ध म्हणाले. तसेच राजीव गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसला सत्ता मिळवून देणाऱ्या सोनिया गांधींचेही त्यांनी कौतुक केले.

























































