
नौदलामध्ये ‘अग्निवीर’ होऊ इच्छिणाऱयांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नौदलात सहभागी होण्यासाठी 9.55 लाख अर्ज प्राप्त झाले असून यात 82 हजार महिला उमेदवारांचा समावेश आहे, अशी माहिती आज नौदलाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून देण्यात आली. केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत नौदलात एसएसआर आणि एमआर या पदांसाठी भरती केली जाणार आहे. भरतीसाठी नोंदणी प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच बुधवारी 80 हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.

























































