राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले आमदार परतीच्या मार्गावर

1757

राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपात जाणार अशी अफवा काही जण जाणीवपूर्वक पसरवत आहेत. यात कोणतेही तथ्य नाही, उलट राष्ट्रवादी कॉँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले आमदार परतीच्या मार्गावर आहेत. लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ट्विट करत खंडण केले आहे.

सहा महिन्यांपासून बोलणी सुरू

जे नेते भाजपमध्ये दाखल झाले आहेत ते पदरी काहीच न पडल्यामुळे कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. काही आमदार शरद पवारांना, दादांना भेटून परत येण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून बोलत आहेत.

काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक

मूळचे काँग्रेसमध्ये असणारे पण निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेले काही आमदार परत काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे स्थिर आहे.पाच वर्षांचा कार्यकाळ हे सरकार पूर्ण करणार आहे याची खात्री पटल्याने ते परत काँग्रेसमध्ये येण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या