नवाझुद्दीनच्या ‘घुमकेतू’चा मसालेदार टिझर रिलीज, पाहा व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडमधील अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी याच्या घुमकेतू या चित्रपटाचा टिझर आज रिलीज करण्यात आला. एक मिनिटाच्या या टिझरमध्ये नवाझने पुन्हा एकदा मसालेदार तडका देत प्रेक्षकांच्या आशा उंचावल्या आहेत.

22 मे रोजी झी5 वर रिलीज होणार असलेल्या या चित्रपटात नवाझुद्दीन एका छोट्या खेड्यातून मुंबईत आलेल्या लेखकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप हे पोलिसाच्या भुमिकेत आहेत. या चित्रपटात नवाझुद्दीन मुख्य भूमिकेत दिसणार असून अमिताभ बच्चन, रणवीर सिंह, सोनाक्षी सिन्हा, चित्रांगदा सिंह, लॉरेन गोटलिब आणि दिग्दर्शक निखिल आडवानी पाहुण्या भुमिकेत दिसणार आहेत.

हा दिवसांपूर्वीच म्हणजे 5 मे रोजी या चित्रपटाचा फर्स्ट लूक व रिलीज तारिख जाहीर केली होती. धुमेकतूचे दिग्दर्शन पुष्पेंद्र नाथ यांनी केले असून प्रोडक्शन फँटम फिल्म्सने केलेले आहे. ‘घुमकेत एका जबरदस्त स्टोरी असून लॉकडाऊनच्या काळात हा चित्रपट तुम्ही कुटुंबासोबत बसून बघू शकता.’ असे नवाझुद्दीन सांगतो.