
सामना प्रतिनिधी । मुंबई
अभिनेता अक्षयकुमार याने ‘हाऊसफुल 4’ या आगामी सिनेमाची घोषणा गेल्या वर्षी केली. तेव्हापासून या सिनेमाबाबतची उत्सुकता ताणली आहे.

अक्षयसोबत क्रिती सॅनोन, बॉबी देओल, पूजा हेगडे, रितेश देशमुख, आणि क्रिती खरबंदा यांच्या प्रमुख भूमिका हाऊसफुल 4 मध्ये आहेत.

यामध्ये आता अभिनेता नवाजुद्दीनची एंट्री झाली आहे. नवाजुद्दीन एका मांत्रिक बाबाच्या भूमिकेत आहे. सिनेमातील सर्व कलाकारांसोबतच्या एका गाण्यात नवाजुद्दीन दिसेल.

या स्पेशल गाण्याच्या शूटींगसाठी फिल्मसिटीमध्ये भव्यदिव्य सेट उभारण्यात आले आहे. पाच दिवस गाण्याचे शूटींग सुरू राहणार आहे. गणेश आचार्य कोरियोग्राफर आहेत. ‘हाऊसफुल 4’च्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनी साजिद नाडियादवाला आणि नवाज एकत्र येतील.





























































