आर्थिक सर्वेक्षणासाठी गेलेल्या महिलेला विचारला धर्म; मोबाईलमधील डेटाही केला डिलिट

922
naziran-bano

देशाच्या राष्ट्रीय आर्थिक सांख्यिकी गणणेचे काम सध्या सुरू आहे. राजस्थानच्या कोटा येथे आर्थिक गणणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र वाईट अनुभव आले आहेत. बुधवारी बोरखेडा येथे सर्वेक्षण करणाऱ्या एका महिलेला तिचा धर्म सांगण्याची सक्ती करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

नझिरन बानो या कोटामध्ये सरकारकडून करण्यात येणाऱ्या आर्थिक सर्वेक्षणासाठी गेल्या असताना त्यांना काही जणांनी धर्म कोणता ते जाहीर करण्यास सांगितले. इतकेच नाही तर कुराणमधील कलमा पढण्यास सांगितले. तसेच हे आर्थिक सर्वेक्षण नसून नारिकत्व सुधारित कायदा CAA संदर्भातील सर्वेक्षण असल्याचे म्हणत त्यांच्याजवळचा मोबाईल घेऊन आर्थिक गणणेचा डाटा डिलीट करून टाकला. नझिरन यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यामध्ये सुमारे 1000 जणांचा डाटा होता. याप्रकरणानंतर घडलेल्या घटनेसंदर्भात नझिरन तक्रार केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या