INDIA ऐवजी भारत छापण्याच्या निर्णयाच्या वृत्तावर NCERT पहिली प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) पॅनेलने पुस्तकांच्या पुढील संचात INDIAऐवजी ‘भारत’ म्हणून छापण्याचा प्रस्ताव सदस्यांनी एकमतानं स्वीकारल्याचं वृत्त इंग्रजी वृत्तपत्रांच्या संकेतस्थळांनी प्रसिद्ध केलं होतं. मात्र NCERT नं आता यावर पहिली प्रतिक्रिया दिली.

आताच यावर टिप्पणी करणं हे घाईचं होईल, असं NCERT कडून सांगण्यात आलं आहे.

‘नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांचं काम सुरू होत आहे. त्या उद्देशाने, NCERT द्वारे डोमेन तज्ज्ञांच्या विविध अभ्यासक्रमांचा गटांना सूचित केलं जात आहे. अशावेळी या बातमीवर भाष्य करणे खूप घाईचं होईल’, असं NCERT नं एका निवेदनात म्हटलं आहे.