
सामना प्रतिनिधी । पुणे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, माजी उपमहापौर दीपक मानकर, साधना वर्तक यांच्यावर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात जमीन बळकावण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. जमीन बळकावल्या प्रकरणी एका आठवड्यात मानकर यांच्यावर कोथरूड, हडपसर आणि विश्रांतवाडी येथे गुन्हे दाखल झाले आहेत.
जमीनीचे मालक फिर्यादी असून ते आपल्या कामानिमित्त अमेरिकेत वास्तव्यास होते. त्यावेळी त्यांच्या सहमती आणि परवानगीशिवाय साधना वर्तक आणि दीपक मानकर यांनी मूळ मालकाच्या हक्काची आणि हिश्शाच्या जमीनीचा व्यवहार केला असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास पोलीस करत आहेत.


























































