कराड तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व, भाजप, देसाई गटाला प्रत्येकी एक ग्रामपंचायत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व राखले आहे. सात ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीप्रणित पॅनलना पाच ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळाली आहे. एका ग्रामपंचायतीत भाजपने, तर एका ग्रामपंचायतीत शंभूराज देसाई गटाने बहुमत मिळवले आहे.

कराड तालुक्यात गुरुवारी झालेल्या सात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी सकाळी जाहीर करण्यात आला. यामध्ये कराड तालुक्यातील पाटण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या उत्तर तांबवे ग्रामपंचायतीत देसाई गटाच्या जय हनुमान ग्राम विकास पॅनलने 4-3 असे सत्तांतर करत विजय मिळवला. उत्तर तांबवे येथील सत्ताधारी पाटणकर गटाला 3 जागांवर समाधान मानावे लागले. विजयी उमेदवार : रोहित बाबूराव चव्हाण, जयसिंग बंडू पाटील, शशिकांत रघुनाथ चव्हाण, विद्या सोमनाथ साठे, रूपाली संदीप पवार, बानुबी शौकत मुल्ला व भारती संदीप चव्हाण.

कोयना वसाहत ग्रामपंचायतीत भाजपच्या डॉ. अतुल भोसले गटाने आपली सत्ता कायम राखत याठिकाणी 10-1 असा विजय मिळवला. तर एका अपक्षाने या निवडणुकीत बाजी मारली. विजयी उमेदवार ः नीलेश मोहन भोपते, कुसुम पांडुरंग पुजारी, विनायक दत्तात्रय कुलकर्णी, सुवर्णा राजेंद्र वळीव, सम्राट अविनाश पाटील, रजनी अशोक गुजर, उमेश दिगंबर कुलकर्णी, संगीता सूर्यकांत पाटील, सुनीता भोसले, चंद्रशेखर पाटील व शीतल जाधव.

बेलवाडी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी व काँग्रेस पुरस्कृत गारजाई माता ग्रामविकास पॅनलने 5 जागांवर विजय मिळवला. विरोधी जय हनुमान ज्योतार्ंलग ग्रामविकास पॅनलला फक्त 2 जागा मिळाल्या. विजयी उमेदवार ः अमर रमेश बोबडे, वनिता संतोष संकपाळ, वनिता विनोद संकपाळ, अमोल विठ्ठल फडतरे, भारती दिलीप फडतरे तसेच वैशाली बापूसाहेब फडतरे व प्रमोद भगवान गायकवाड.

नाणेगाव बुद्रूकमध्ये संभाजी खाशाबा बोलके, दीपाली नवनाथ बोलके, नम्रता प्रल्हाद बोलके व वसंत बापू भोसले हे विजयी झाले. शितळवाडी ग्रामपंचायतीत प्रशांत प्रकाश बर्गे, किणी परशराम यादव, अरुण श्रीपती शितोळे, उज्ज्वला विश्वनाथ बर्गे, युवराज विठ्ठल शितोळे व अंजली संजय शितोळे हे उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच पश्चिम उंब्रज ग्रामपंचायतीत प्रमोद रंगराव घाडगे, रेखा संतोष घाडगे, धनश्री संतोष घाडगे, शहाजी रंगराव घाडगे व अन्य दोन उमेदवार विजयी झाले आहेत. उत्तर कोपर्डे ग्रामपंचायतीच्या 5 जागा याआधीच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित 2 जागांवर सागर आनंदराव चव्हाण व बाळासाहेब अंतू चव्हाण हे विजयी झाले आहेत. या चारही ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीने सत्ता मिळवली आहे.