
सामना प्रतिनिधी । नगर
माननीय ळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य लोकांच्या हक्कासाठी व त्यांना त्यांच्या न्यायासाठी या शिवसेना पक्षाची स्थापना केली. या पक्षामध्ये स्वत:च्या घरात सर्व पदे न ठेवता सर्वसामन्यांना संधी दिली जाते. या शिवसैनिकाला असे वाटते की सर्व काही मलाच भेटले पाहिजे अशी स्वार्थी लोक यांना अनेक संधी देऊनही त्यांचे मन भरत नाही, मग ते या पक्षाशी गद्दारी करुन दुस-या पक्षामध्ये जातात असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले.
राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुरेश आंबेकर यांनी शिवसेनेत जाहिर प्रवेश केल्यापासुन त्यांचे स्वागत शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले. या प्रसंगी जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, मेहुल भंडारी, संभाजी कदम, अशोक दहीफळे, फुलारे व सारसनगर, अवसरकर मळा, आंबेकर मळ्यातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
या सारसनगर परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासुन बिनविरोध निवडणुका होत होत्या आणि कुठल्याही स्थानिक कार्यकर्त्याला संधी दिली जात नव्हती. घराणेशाहीलाच पुढे ढकलण्याचे काम सातत्याने होत होते. पण आता या भागातील नागरिकांना याचा कंटाळा आला असुन स्वत:चे कार्य जनते समोर आणण्यासाठी एकमेव शिवसेना पक्ष आहे असे वाटत आहे आणि या पक्षामध्ये सर्वसामान्यांना मोठा मान मिळतो आणि न्यायही मिळतो. यामुळे शिवसेनेत लोकांची संख्या कायम वाढतच असते असे मत जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी व्यक्त केले.

























































