
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट आणि राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दोन कोटींची मदत देण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य व संसद सदस्यांच्या एका महिन्याच्या वेतनाचा समावेश आहे.
काँग्रेस नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी एक वर्षाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आल्यानंतर यासाठी आता राष्ट्रवादीनेही पुढाकार घेतला. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट आणि राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दोन कोटींची मदत देण्यात आली आहे.
कोरोनासोबत लढण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये, तर राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य व संसद सदस्यांचे एक महिन्याचे वेतन असे एकूण दोन कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.


























































