
सामना ऑनलाईन, नाशिक
माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी वर्धापनदिनानिमित्त शिवसेनेला शुभेच्छा दिल्या, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले. नाशिकच्या भुजबळ फार्म येथे मंगळवारी वृत्तपत्रांचे संपादक आणि वरिष्ठ पत्रकारांशी भुजबळ यांनी चर्चा केली. यानंतर त्यांनी शिवसेनेचा आज ५२वा वर्धापनदिन आहे, हे सांगत शिवसेनेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांचेही अभिनंदन केले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ हेही उपस्थित होते.

























































