राहुल गांधींच्या विदेश दौऱ्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

1069
sharad-pawar-new

#MahaElection 2019 राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जसजशी जेवळ येत चालली आहे तसतशी रणधुमाळीची रंगत वाढत चालली आहे. सर्वच पक्षांकडून प्रचार, मुलाखतींतून आरोपप्रत्यारोप, विविध प्रश्नांवर पक्षांच्या भूमिका स्पष्ट केल्या जात आहेत. सोशल मीडियावर चर्चिले जाणारे मुद्दे देखील गांभीर्याने घेतले जात आहेत. अशातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे ऐन प्रचारादरम्यान विदेश दौऱ्यावर जाण्याचा. आता या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

हिंदी वृत्तवाहिनी ‘आजतक’ने घेतलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात त्यांनी आपली भूमिका मांडली. लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांचे मुद्दे पूर्णत: वेगळे असल्याचे ते यावेळी म्हणाले. या मुलाखती दरम्यान शरद पवार यांना राहुल गांधी यांच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. ऐन प्रचाराच्या काळात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे विदेश दौऱ्यावर गेले असे म्हणताच पवार म्हणाले की यात मला तथ्थ्य वाटत नाही. राहुल गांधी एक-दोन दिवसांसाठी विदेशात गेले तर त्या गोष्टीला घाबरले, मैदानातून पळ काढला असे म्हणणे चुकीचे ठरेल. त्याच्या प्रचारसभा महाराष्ट्रात होणार आहेत. त्यांचा कार्यक्रम देखील मी वाचला आहे. तेव्हा मैदान सोडले असे बोलणे योग्य ठरणार नाही. राहुल गांधींच्या विदेश दौऱ्याला अशा प्रकारे मांडणे हा प्रपोगंडा असल्याचेही ते म्हणाले.

यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे विधान देखील त्यांनी खोडले. सुशीलकुमार शिंदे यांनी केलेले विधान हे त्यांच्या संदर्भात होते. आम्ही थकलो नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिंदेंनी काँग्रेस पक्षाबद्दल बोलावं! शरद पवार भडकले

 

आपली प्रतिक्रिया द्या