
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातून त्यांच्या तब्येतीची विचारपूस होऊ लागली आहे. खुद्द शरद पवार यांनी सोशल मीडियावरून यासंदर्भात ट्विट केले आहे. आपल्या तब्येतीची विचारपूस करून शुभचिंतन करणाऱ्यांचे त्यांनी आभार मानले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. त्यावर पवार यांनी ट्विटरवरून आभार मानले. ‘महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी माझ्या प्रकृतीसंदर्भात अत्यंत आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या सदिच्छा या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक भावना आहेत. मनपूर्वक आभार!’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह गानसम्राज्ञी लता मंगशकर, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील त्यांची विचारपूस केली. त्यांचेही शरद पवार यांनी आभार मानले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी माझ्या प्रकृतीसंदर्भात अत्यंत आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या सदिच्छा या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक भावना आहेत. मनपूर्वक आभार! @OfficeofUT@CMOMaharashtra
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2021
लता मंगेशकर
माझ्या प्रकृती अस्वास्थ्याची बातमी कळताच आदरणीय लता मंगेशकर दिदींनी माझ्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माझ्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. लता दिदींसारख्या सुहृदय व्यक्तींच्या सदिच्छा माझ्या सोबत आहेत. त्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे.@mangeshkarlata
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2021
डॉ. हर्षवर्धन
Received a phone call from Shri @drharshvardhan ji to check about my health. Appreciate him checking on my health and well-being.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2021
मनसे अध्यक्ष राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. राज ठाकरे यांनी माझ्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सदिच्छा व्यक्त करत आस्थेने चौकशी केली. त्यांचे मनापासून आभार! @RajThackeray
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2021































































