
सामना प्रतिनिधी । मुंबई
माण विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे माजी नेते शेखर गोरे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. गुरुवारी सायंकाळी ‘मातोश्री’ या निवासस्थानी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये भगवा हाती घेतला. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून व खांद्यावर भगवा ध्वज देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी नितीन बानुगडे-पाटील, दगडूदादा सपकाळ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे साताऱ्यातील माण खटाव तालुक्याचे नेते शेखर गोरे जी यांनी आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/w25pr3fvyX
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) August 8, 2019
शेखर भाऊ गोरे यांच्या पक्षप्रवेशाने माण खटाव तालुक्यातील शिवसेनेला आणखी बळ मिळाले आहे. शेखर गोरे हे गेल्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर होते. निवडणुकीत पराभव झाला तरी त्यांनी राजकारण बाजूला ठेवून समाजकारण सुरुच ठेवले. कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना देखील त्यांनी अखंडपणे माण खटाव तालुक्यातील लोकांना 16 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करत त्यांची तहान भागवली. तसेच शैक्षणिक क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थी वर्गाला मदत, स्वखर्चातून मंदिर, रस्ते, शाळा, अशा प्रकारे लोकांची सेवा करणाऱ्या शेखर गोरे यांच्या शिवसेना प्रवेशाने माण खटाव तालुक्यातील सेनेला आणखी बळ मिळाले आहे.






























































