छत्रपतींची तुलना मोदींशी केली तेव्हा संभाजी भिडे गप्प का होते; सुप्रिया सुळे यांचा सवाल

1389
supriya-sule-ani

सांगली जिल्ह्यात शुक्रवारी संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता. उदयनराजे भोसले यांच्यासंदर्भात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याला विरोध करण्यासाठी बंद पुकारण्यात आला होता. या बंदबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केली तेव्हा संभाजी भिडे का गप्प राहिले, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

“हा बंद म्हणजे दुर्दैव म्हणावे लागेल. ज्या छत्रपतींनी आपल्याला कष्ट करायला शिकवले त्यांच्यासाठी ‘बंद’, हे चुकीचे वाटते. यात काहीतरी राजकीय षडयंत्र दिसत आहे, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीच्या दौऱ्यावर असताना असा बंद करणे योग्य वाटत नाही. सध्या राज्यासमोर अनेक गंभीर प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष द्यायला हवे” असे मतही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या