Video – ट्रकभर पुराव्यांच काय झालं? खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप नेते किरीट सोमय्या गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीवर आरोप करत आहेत. परंतु किरीट सोमय्या हे प्रसिद्धीसाठी आरोप करत असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच आमच्याविरोधात ट्रकभर पुरावे देणारे होते त्याचं काय झाले असा सवालही त्यांनी यावेळी केला. खोटे आरोप केल्यास खूप प्रसिद्धी मिळते, त्यांना आनंद होतो हा सेवाभाव आम्ही जोपासला असल्याचे सुळे यांनी नमूद केले.

चंद्रपूर दौऱ्यावर असताना पत्रकारांशी वार्तालाप कार्यक्रमात त्या बोलत होत्या त्यावेळी त्यांच्या सोबत आमदार चंद्रिकापुरे, माजी मंत्री सुबोध मोहिते, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य, अशोक जीवतोडे यांची उपस्थिती होती.