नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर 30 नोव्हेंबरला निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालय 30 नोव्हेंबरला निर्णय देणार आहे. निकालपत्र अजून पूर्ण होऊ शकलेले नाही, असे सांगत विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी गुरुवारी मलिक यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली.

नवाब मलिक यांनी आपल्याविरुद्ध कुठलाही प्रेडीकेट गुन्हा नसल्याचा दावा करून जामिनासाठी सत्र न्यायालयात दाद मागितली आहे. त्यांच्या या अर्जावर विशेष सत्र न्यायाधीश रोकडे यांनी सुनावणी केली. 14 नोव्हेंबरला दोन्ही बाजूकडील युक्तिवाद पूर्ण झाले. त्यानंतर न्यायाधीशांनी निर्णय राखून ठेवला आहे. हा निर्णय गुरुवारी जाहीर केला जाण्याची शक्यता होती, मात्र निकालपत्र अजून तयार झालेले नाही, असे सांगून न्यायाधीश रोकडे यांनी सुनावणी तहकूब केली.