चिपळूणात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का; अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिपळूण शहरातील मापारी मोहल्ला येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या सर्वांचे आमदार सदानंद चव्हाण यांनी शिवसेनेत स्वागत केले. मापारी मोहल्ल्यातील अस्लम भाटकर, आरिफ सिद्धीकी, रफीक खान, शकील पेवेकर, विक्रम साळुंखे व त्यांचे सहकारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला.आमदार सदानंद चव्हाण यांच्या कार्यपध्दतीवर आम्ही समाधानी असून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आम्ही शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपशहरप्रमुख महम्मद फकीर, इब्राहिम खान, भाऊ भाटकर, अब्दुल्ला फकीर, मयूर फटकुरे आदी उपस्थित होते.