एनडीएला 350 जागा मिळणार, रामदास आठवलेंनी व्यक्त केला विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ramdas-athawale

सामना ऑनलाईन । गुवाहटी

‘एनडीएला या निवडणूकीत 350 पेक्षा जास्त जागा मिळतील’, असा विश्वास एऩडीएचे घटकपक्ष असलेल्या रामदास आठवलेंनी व्यक्त केला आहे. आसाममधील रिपाईच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.

रिपाईने आसाममधील दुब्रीमधून मेहबुबार रहमान, बारपेटामधून रेजाऊल करिम व गुवाहटीतून सादेक अली यांनी तिकीट दिले आहे. त्यांच्या प्रचारासाठी आज ते गुवाहटी येथे आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी महागठबंधनवर देखील टीका केली. ‘एनडीएकडे नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधानपदाचा उमेदवार आहे. मात्र महागठबंधन पंतप्रधानपदाच्या दावेदाराशिवायच प्रचार करत आहेत. त्याचा फटका त्यांना नक्कीच बसणार आहे. एनडीए सहज देशात 350 जागांवर विजय मिळवेल. उत्तर प्रदेशमध्ये देखील एनडीए 65 च्या वर जागा मिळेल. तिथे महागठबंधनमध्ये पडलेल्या फूटीचा फायदा भाजपला होणार, असे आठवले यांनी यावेळी सांगितले.