सुईमुक्त ‘झायडस-कॅडिला’ लसीचा वापर लवकरच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमात आता आणखी एका नव्या लसीचा समावेश होणार आहे. ‘झायडस कॅडिला’ कंपनीच्या या लसीचे नाव आहे ‘झायकोव-डी’. या लसीचे वैशिष्ट्य म्हणजे ही लस देण्यासाठी सीरिंज आणि सुई वापरावी लागत नाही. लहान मुलांच्या लसीकरणासाठी ही लस महत्त्वाची ठरणार आहे.

सध्या राष्ट्रीय कोरोना लसीकरण कार्यक्रमासाठी कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड आणि रशियन स्पुटनिक व्ही अशा तीन लसींचा वापर केला जात आहे. त्यात ‘झायकोव-डी’ ही चौथी लसही येत आहे.

देशात पहिल्यांदाच अशा नीडलप्री लसीचा वापर केला जाणार आहे. फार्माजेट ऑप्लिकेटरमध्ये ही लस भरून ती शरीरात टोचता येणार आहे. सीरींज किंवा सुई वापरण्याची गरज नाही. या पद्धतीमुळे लसीकरण अधिक वेगाने होऊ शकणार आहे. ‘झायकोव-डी’ ही लस 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी वापरली जाणार आहे. ही लस डेल्टा व्हेरिएन्टवरही प्रभावी आहे.