नीरजच्या भाल्याला पुन्हा सुवर्णखात्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘हिंदुस्थानचा गोल्डनबॉय’ भालाफेकपटू नीरज चोप्राला सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्याची खात्री आहे. सध्या आपली तयारी उत्तम सुरू असून शरीरही साथ देत आहे. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपला भाला सोन्याला हमखास भेदेल, असा विश्वास नीरजने व्यक्त केला. ऑलिम्पिकच्या तयारीसाठी नीरज दक्षिण आफ्रिका येथून तुकाa येथे दाखल झाला आहे.

नीरजने 2021 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक सुवर्णकमाई केली होती. त्यानंतर नीरजने जागतिक, आशियाई या स्पर्धांमध्येही सुवर्ण काबीज केले. डायमंड लीगमध्येसुद्धा नीरजने वर्चस्व अबाधित राखले. आता 26 जुलैपासून रंगणाऱया पॅरिस ऑलिम्पिकसाठी नीरज तुकाaत सराव करणार आहे. नीरजने 2022च्या डायमंड लीगमध्ये 89.94 मीटर अंतरावर भालाफेक केली होती. ही त्याची आजवरची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. नीरजने यंदा 90 मीटरचे लक्ष्य पार करण्याचे ठरवले आहे.

‘संपूर्ण देशाच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत, मात्र मी याचे दडपण न बाळगता याद्वारे स्वतःला प्रेरीत करतो. हिंदुस्थानचा तिरंगा असलेली जर्सी घालून जेव्हा मी भाला हातात घेऊन धावतो तेव्हा डोळय़ांसमोर फक्त देशासाठी पदक जिंकायचे, इतकेच मला ठाऊक असते. सध्या माझे शरीर उत्तम लयीत असून सरावही जोरात सुरू आहे. मी सरावात आमूलाग्र बदल केला असून याचा मला फरक जाणवत आहे. ऑलिम्पिकपूर्वी मला सरावात 90 मीटरचे अंतर सर करायचे आहे. जेणेकरून मी मुख्य स्पर्धेत हे लक्ष्य साध्य करू शकेन,’ असे नीरज म्हणाला.