नीटची परीक्षा यंदाही जुन्याच पॅटर्ननुसार; नवा पॅटर्न पुढील वर्षापासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीट-एसएस परीक्षेच्या पॅटर्नमध्ये अंतिम टप्प्यात बदल केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर पेंद्र सरकार अखेर ताळ्यावर आले आहे. नीट-पीजी सुपरस्पेशालिटी परीक्षा यंदा जुन्याच पॅटर्ननुसार होईल आणि नवा पॅटर्न पुढील शैक्षणिक वर्षापासून लागू केला जाईल, अशी माहिती केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला दिली. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी झाली. यावेळी पेंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करून बाजू मांडली.

मंगळवारच्या सुनावणीवेळी परीक्षेच्या पॅटर्नमधील बदलावरून न्यायालयाने केंद्र सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बुधवारी आपल्या भूमिकेत ‘यूटर्न’ घेतला. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आम्ही नीट-सुपरस्पेशालिटी परीक्षेच्या पॅटर्नमध्ये केलेले बदल शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून लागू केले जातीले, असे सरकारने सांगितले.