हेलिकॉप्टरचा ‘नीट’ सराव!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

21 जून रोजी होणाऱ्या ‘नीट’च्या फेरपरीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) कडून पेपर लीक होऊ नये, यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे. पेपर लीक होऊ नये, सुरक्षित राहावे यासाठी केंद्र सरकारने थेट लष्कराची मदत घेतली आहे. नीट परीक्षेचे पेपर हेलिकॉप्टरने पुरवले जाणार आहेत. याचाच भाग म्हणून ‘हिंदुस्थानी एअर फोर्सच्या एमआय-17 या हेलिकॉप्टरने नीटचा पेपर तामीळनाडूतील तिरुनेलवेली येथे आणण्याचे प्रात्यक्षिक आज करण्यात आले.