नेपाळचे माजी पीएम केपी ओली प्रकटले!

नेपाळमधील ‘जेन-झी’च्या हिंसक आंदोलनामुळे पायउतार व्हावे लागलेले व अज्ञातवासात गेलेले माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली आज प्रथमच समोर आले. नेपाळच्या विद्यमान सरकारवर त्यांनी ‘पब्लिसिटी सरकार’ असे म्हणत टीका केली. ‘देशातील सध्याचे सरकार घटनात्मक नाही. लोकांच्या मतांवर निवडून आलेले नाही. तोडफोड आणि जाळपोळ करून हे सरकार बनवले गेले आहे, असे ते म्हणाले. ओली यांनी ‘जेन-झी’ सरकारच्या हेतूंवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ’या सरकारला वाटते की आम्ही देश त्यांच्या हाती सोपवून परदेशात पळून जाऊ, पण तसे होणार नाही, असे त्यांनी ठणकावले.