
सामना ऑनलाईन । लखनौ
उत्तर प्रदेशमधील हमीरपूर येथे एका महिलेची तिच्या पुतण्याने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्या नराधम तरुणाचे त्याच्या काकीवर एकतर्फी प्रेम होते व तो तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत होता. मात्र काकीने तसे करण्यास नकार दिल्याने त्याने धारदार शस्त्राने गळा चिरून तिची हत्या केली.
हमीरपूर जिल्ह्यातील पलरा गावात 29 वर्षीय शबनम तिचा पती बबलू खानसोबत राहायची. त्यांचा झाडू बनविण्याचा व्यवसाय होता. त्या व्यवसायात त्यांचा पुतण्या निसार त्यांना मदत करायचा. बुधवारी सकाळी बबलू शेतातील कामासाठी बाहेर गेला होता. त्यावेळी नासिरने पुन्हा एकदा शबनमकडे शारीरिक सुखाची मागणी केली. मात्र शबनमने त्याला नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या निसारने धारदार सुऱ्याने शबनमचा गळा चिरला. शबनमचा आवाज ऐकून शेजारी राहणारे तिच्या घरी आले. त्यावेळी त्यांना नासिर रक्ताने माखलेला सुरा घेऊन धावताना दिसला. त्यानंतर त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसात कळविले. या प्रकरणी पोलिसांनी काही वेळातच नासिरला शेतातून अटक केली.

























































