‘Netflix’ युजर्ससाठी मोठी बातमी, कंपनीने घेतला ‘या’ ग्राहकांची मेंबरशीप रद्द करण्याचा निर्णय

ऑनलाईन स्ट्रीमिंग फ्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स (Netflix) चे सध्या लाखो युजर्स आहेत. उत्तमोत्तम हिंदी, इंग्रजी चित्रपट, जगभरातील वेबसिरीज, डोक्यूमेंट्रीसाठी सध्या तरुण मंडळी नेटफ्लिक्सला पसंती देते. मात्र कंपनीने आता काही ग्राहकांची मेंबरशीप रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ग्राहकांनी गेल्या एक वर्षात नेटफ्लिक्सचा वापर केलेला नाही अशा युजर्सला कंपनीने दणका दिला आहे.

कंपनीच्या मते काही अशी अकाउंट आहे जे मेंबरशीपची फी देत आहेत, मात्र त्यांनी गेल्या वर्षभरात कोणताही कंटेंट स्ट्रीमिंग केलेला नाही. अशा अकाउंट धारकांना कंपनी ईमेल पाठवत असून त्या नंतर त्यांची मेंबरशीप रद्द करण्यात येईल. कंपनीचे संचालक एडी वू के यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, यामुळे कंपनीवर जास्त भार पडणार नाही. कारण अशा युजर्सची संख्या 0.50 टक्के आहे.

युजर्सला नोटिफिकेशन
तसेच कंपनी काही अशा युजर्सलाही नोटिफिकेशन पाठवत आहे ज्यांनी गेल्या 2 वर्षात या प्लॅटफॉर्मवर एकही सिरीज, चित्रपट पाहिला नाही. सर्व निष्क्रिय सदस्यांना नोटिफिकेशन पाठवून मेंबरशीप ठेवायची अथवा नाही याबाबत जाणून घेत आहे. जर एखाद्याचा रिप्लाय आला नाही तर कंपनी स्वतःहून त्याची मेंबरशीप रद्द करणार आहे. मात्र कंपनी त्या युजर्सची फेव्हरेट कंटेंट लिस्ट 10 महिने आहे त्याच स्थितीत ठेवणार असून युजर्सला वाटल्यास तो पुन्हा मेंबर होऊ शकतो.

मेहनतीचा पैसे वाचावे म्हणून…
एडी वू म्हणाले की, हे पाऊल उचलण्यामागे कंपनीचे गुडविल कायम राहावे हा उद्देश आहे. याद्वारे लोक आपल्या मेहनतीचे पैसे वाचवू शकतात, असे वू म्हणाले. सध्या नेटफ्लिक्सचे जवळपास दीड कोटी सबस्क्राईबर आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या