बांधाच्या वादातून शेतकऱ्याचा खून, नेवासा पोलिसांत पाचजणांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

शेतातील बांधाच्या वादातून शेतकऱयाचा खून झाल्याची घटना नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथे मंगळवारी संध्याकाळी घडली आहे. याप्रकरणी पाचजणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तात्रय लक्ष्मण ठोंबरे (वय 40) असे खून झालेल्या शेतकऱयाचे नाव आहे. महेंद्र गुलाबराव भिंगारदे, भूपेंद्र महेंद्र भिंगारदे, अक्षय महेंद्र भिंगारदे, कोमल धर्मराज भिंगारदे, राजेंद्र वसंतराव भिंगारदे (सर्व रा. गोधेगाव, ता. नेवासा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयताचा भाऊ ज्ञानेश्वर लक्ष्मण ठोंबरे यांनी फिर्याद दिली आहे.

ठोंबरे व महेंद्र भिंगारदे यांची शेजारी-शेजारी घरे व जमिनी आहेत. दोन दिवसांपूर्वी भिंगारदे यांच्या उसाला तोड आली होती. अनेक दिवसांपासून त्यांच्यात शेती बांध व वहिवाटीच्या रस्त्यावरून वाद सुरू होता. महेंद्र भिंगारदे याने वादात असलेल्या रस्त्यावर मुरूम टाकल्याने ऊसवाहतुकीत अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी ठोंबरे आणि त्यांचा भाऊ ज्ञानेश्वर हे तो मुरूम पसरवत होते. त्याचवेळी वरील आरोपींनी तेथे येत दत्तात्रय यांना खाली पाडून मारहाण केली. भूपेंद्र भिंगारदे याने कुऱहाडीने त्यांच्या डोक्यात वार केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी नेवासे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व नेवाशाचे
सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.