
सामना प्रतिनिधी। नेवासा
सरकारकडून शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नसल्याने नेवासा शहरातील रविवारी झालेल्या आठवडा बाजारात पुनतगाव येथील पोपटराव वाकचौरे या शेतकऱ्याने बाजारात भाजप सरकारचा निषेध करत चक्क वीस क्विंटल कांदयाचे फुकट वाटप केले. हा फुकट कांदा घेण्यासाठी बाजारातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कमी भाव देऊन शेतकऱ्यांना मातीत घालण्याचे काम भाजपच्या या सरकारने चालविली असल्याची प्रतिक्रिया शेतकरी पोपटराव वाकचौरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
नेवासा येथील रविवारी आठवडा बाजार होता. नेवासा तालुक्यातील पुनतगाव येथील शेतकरी पोपटराव वाकचौरे यांनी एकूण तीस ते चाळीस गोण्या कांदा बाजारात आणला तो विकण्यासाठी माही. तर फुकट वाटण्यासाठी . नेवासा खुर्द जिल्हा परिषद शाळेच्या गेटसमोर चारचाकी वाहनावर “मोफत कांदा”असा फलक लावून फुकट कांदे. फुकट कांदे म्हणत शेतकऱ्याने कांदा फुकट वाटला हा कांदा घेण्यासाठी यावेळी आपल्या पिशव्या भरून घेतल्या. हे सर्व प्रकार पहाण्यासाठी मोठी गर्दी झाली होती,कांदा विकत असतांना दानपेटी देखील ठेवण्यात आली होती. कोणी आपल्या इच्छेनुसार दानपेटीत पाच,दहा रुपये टाकताना दिसत होता.
मी दोन एकरात कांदा लागवड केली यासाठी मला एक ते दीड लाख रुपये खर्च आला. चांगला भाव मिळेल या आशेने मी कांदा वाळवत ठेवला. मात्र सरकारने एक रुपया व दीड रुपया किलो असे भाव दिल्याने मी हवालदिल झालो. शेतकऱ्यांची ही सरकारने क्रूर चेष्टा लावली आहे. एक लिटर पाण्याच्या बाटलीला तुम्ही वीस रुपये देता. मात्र आम्हा शेतकऱ्यांना खालच्या स्तरावर भाव देऊन देशोधडीला लावण्याचा प्रयत्न या सरकारने केला असून सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत अती नालायकपणा चालवला आहे अशी प्रतिक्रिया पोपटराव वाकचौरे यांनी व्यक्त केली आहे.

































































