
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
रत्नागिरी डी-मार्टला मी कधीही विरोध केला नव्हता उलट निवड झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मनात अनेक शंका होत्या त्याबाबत मी आज डी-मार्टचे महाराष्ट्राचे प्रमुखांशी फोनवर बोललो. तसेच डी-मार्ट लवकरात लवकर सुरु होईल असा विश्वास शिवसेना उपनेते आणि म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी सांगितले.
रत्नागिरीत सुरु होणाऱ्या डी-मार्ट या व्यापारी संकुलाला येथील आमदार उदय सामंत यांचा विरोध असल्याची टीका काही राजकीय पक्षांनी केली होती. मात्र रत्नागिरीत होत असलेल्या या व्यापारी संकुलासाठी आमचा कधीच विरोध नव्हता अशी प्रतिक्रिया आमदार उदय सामंत यानी दिली आहे. डी-मार्टच्या संदर्भात स्थानिक युवकांची व डी-मार्टमध्ये लागलेल्या रत्नागिरितिल 30 उमेदवारांची बैठक नुकतीच आमदार उदय सामंत व नगराध्यक्ष राहूल पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी आमदार उदय सामंत यानी त्या सर्व भरती झालेल्या उमेदवारांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी डी-मार्टच्या प्रशासनाशी फोन वरुन संपर्क साधला. या सर्व प्रक्रियेनंतर डी-मार्ट व्यापारी संकुल येत्या 8 दिवसात सुरु करण्यासाठी आमदार म्हणून विशेष प्रयत्न राहतील असा विश्वास त्यानी यावेळी दिला.

































































