नव्या डॉक्टरांची नेमणूक करताना आरोग्य समितीला विश्वासात घ्या! : विनोद झगडे

520

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 74 जागांसाठी बीएएमएस डॉक्टरांची भरती होणार आहे. या भरती प्रक्रीयेनंतर 74 डॉक्टरांची प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती करताना जि.प़ आरोग्य विभाग समितीला विश्वासात घ्यावे अशी मागणी जि.प़.चे आरोग्य सभापती विनोद झगडे यांनी केली आहे.

74 डॉक्टरांच्या भरतीची कार्यवाही सुरु झाली आहे. 74 जागांवर बीएएमएस डॉक्टर भरण्यात येणार आहेत. त्यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. यापुर्वी डॉक्टरांची नेमणूक जिल्हा परिषदेमार्फत केली जात होती. जि.प.त्यांना 16 हजार रुपये वेतन देत होती. नव्याने होणारी भरती ही राज्य सरकारकडून होत असल्यामुळे राज्य सरकार त्यांना दरमहा 40 हजार रुपये वेतन देणार आहे. त्यामुळे यापुर्वी 16 हजार रुपयांच्या वेतनावर वैद्यकिंय सेवा देणार्‍या बीएएमएस डॉक्टरांना प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी यापुर्वीच जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत झाली आहे.

74 डॉक्टरांची निवड झाल्यानंतर त्यांची नेमणूक प्राथमिक आरोग्य केंद्रात करताना जि.प़ आरोग्य समितीला विश्वासात घ्यावे़ कारण प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकिय सेवा उपलब्ध होत नसल्याच्या डॉक्टर नसल्याच्या तक्रारी आमच्याकडे येत असतात. त्यामुळे व ठिकाणी डॉक्टरांची गरज आहे हे आरोग्य समितीला माहिती असल्यामुळे नियुक्ती करताना आरोग्य समितीलाही विश्वासात घ्यावे अशी मागणी आरोग्य सभापती विनोद झगडे यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या