
सामना ऑनलाईन । मुंबई
दैनंदिन जीवनाचा आवश्यक भाग बनलेल्या व्हॉट्सअॅपने आपल्या युझर्ससाठी एक नवं फिचर बाजारात आणलं आहे. या व्हॉट्सअॅप फिचरमुळे युझर्सचा वेळ आणि त्रास वाचणार आहे. पण एक महत्वाची बाब म्हणजे हे फिचर फक्त आयफोन युझर्सनाच मिळणार आहे. अँड्रॉईड युझर्सना हे फिचर उपलब्ध होणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
व्हॉट्सअॅपवरून फोटो, व्हिडीओ-ऑडिओ, डॉक अशा विविध फाईल्सची मोठ्या प्रमाणावर देवाण-घेवाण केली जाते. नोटीफिकेशन आल्यानंतर प्रत्येकवेळी व्हॉट्सअॅप सुरू करावे लागते. आता आयफोन युझर्सना नोटीफिकेशन स्कॅन करून मीडिया फाईल्स पाहाता येतील. यासाठी युझर्सना फक्त नोटीफिकेशन खालच्या दिशेने स्वाईप करावं लागेल. प्रत्येकवेळी व्हॉट्सअॅप सुरू करण्याची गरज लागणार नाही. त्यामुळे वेळ आणि त्रास वाचेल, असं म्हटलं जात आहे.
आयफोन युझर्सपैकी आयओएस १० आणि त्या वरचे ऑपरेटिंग सिस्टम असणाऱ्या फोनमध्येच हे फिचर उपयोगात येईल. आणखी काही नवे फिचर व्हॉट्सअॅप आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते.
summary: new whatsapp feature for iPhone users
























































