सहा राज्यांमध्ये नवे राज्यपाल

36

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालसह सहा राज्यांत नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. मध्य प्रदेशच्या विद्यमान राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना उत्तर प्रदेशची तर बिहारचे राज्यपाल लालजी टंडन यांना मध्य प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे.

राज्यपाल राम नाईक (उत्तर प्रदेश), केसरीनाथ त्रिपाठी (पश्चिम बंगाल), कप्तानसिंह सोलंकी (त्रिपुरा) आणि पद्मनाथ आचार्य (नागालँड) या चार राज्यपालांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. बिहार आणि मध्य प्रदेशच्या राज्यपालांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बिहारमध्ये फगू चौहान, त्रिपुरात रमेश बैंस आणि नागालँडमध्ये आर. एन. रवी यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या पश्चिम बंगालची जबाबदारी जगदीप धनखर यांच्याकडे सोपविली आहे.

महाराष्ट्रासह पाच राज्यांच्या राज्यपालांचा कार्यकाळ लवकरच पूर्ण

महाराष्ट्रासह पाच राज्यांच्या राज्यपालांचा कार्यकाळ येत्या दोन महिन्यांत पूर्ण होत आहे. त्यामुळे येथेही बदल होणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांचा कार्यकाळ 29 ऑगस्टला तर गोव्याच्या मृदुला सिन्हा (30 ऑगस्ट), कर्नाटकाचे वाजूभाई वाला (31 ऑगस्ट), राज्यस्थानचे कल्याण सिंह (3 सप्टेंबर) व केरळचे पी. सदाशिवम (5 सप्टेंबर) यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या