सरकारचे नवे लेबर कोड आणणार; स्त्री-पुरुषांना समान वेतन, 4 दिवसांचा आठवडा, पीएफ वाढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात नवीन कामगार कायदा (लेबर कोड) लागू करण्याची केंद्र सरकारची तयारी सुरू आहे. या नव्या लेबर कोडमुळे नोकरदार वर्गाच्या कामाच्या पद्धतीत आमुलाग्र बदल होणार आहेत. मात्र, देशभरात नवे लेबर कोड कधी लागू करण्यात येणार याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र, हे नवे लेबर कोड लागू करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. या नव्या लोबर कोडमुळे कामाच्या पद्धती आणि वेळा बदलण्याची शक्यता आहे.

कामाच्या वेळा आणि कामाची जागा सोयीस्कर असायला हवी, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले होते. फ्लेक्सिबल वर्क प्लेस आणि फ्लेक्सिबल वर्किंग अवर ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले होते. नव्या लेबर कोडमध्ये याचा विचार करण्यात आला असून कामच्या पद्धतीत बदल होणार आहेत.

सर्व राज्यांनी एकाचवेळीनवे लेबर कोड लागू करावे, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. लोकांचे जीवनशैली आणि कामीची शैली याचा ताळमेळ घालण्यासाठी नवे लेबर कोड आणण्यात येत आहे. त्यासाठी लेबर कोड वेज, सोशल सिक्योरिटी (Social Security), इंडस्ट्रियल रिलेशंस (Industrial Relations) आणि ऑक्यूपेशनल सेफ्टी (Occupational Safety) याचा नव्या लेबर कोडमध्ये समावेश असेल.

नव्या लेबर कोडमधील चार दिवसांचा आठवडा आणि तीन दिवसांची साप्ताहिक सुटी याबाबत सर्वाधिक चर्चा आहे. नव्या लेबर कोडमध्ये चार दिवस काम आणि तीन दिवस सुटीची तरतूद असण्याची शक्यता आहे. मात्र, ही तरतूद लागू झाल्यास चार दिवस 12 तास काम करावे लागणार आहे. आठवड्यात एकूण 48 तास काम केल्यानंतर तीन दिवसांची सुटी मिळणार आहे.

नव्या लेबर कोडमध्ये दीर्घकालीन सुटीसाठीही तरतूद आहे. याआधी दीर्घकालीन सुटीसाठी 240 दिवस काम करणे आवश्यक होते. मात्र, आता नव्या लेबर कोडमध्ये दीर्घकालीन सुटीसाठी 180 दिवस काम करणे गरजेचे आहे. नव्या लेबर कोडनुसार 180 दिवस (6 महिने) काम केल्यानंतर दीर्घकालीन सुटी घेता येणार आहे.

नवे लेबर कोड लागू झाल्यावर टेक होम सॅलरी कमी होणार आहे. कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी त्यांच्या एकूण सॅलरीच्या 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असायला हवी, अशी तरतूदही यात आहे. त्यामुळे पीएफ वाढणार आहे. पीएफची रक्कम वाढल्याने टेक होम सॅलरी कमी होणार आहे. माक्ष, सेवानिवृत्तीच्या वेळी पीएफ आणि ग्रॅच्युइटीपोटी चांगली रक्कम होतात पडणार आहे. तसेच नव्या लेबर कोडमध्ये स्त्रीपुरुषांना समान वेतन असणार आहे. चार दिवसांच्या आठवडा या संकल्पनेमुळे या नव्या लेबर कोडची चर्चा होत आहे.