तरुणांचे निखळ मनोरंजन करणारा ‘सिंगल’

आजकाल कोणी ‘एकटे’ असले की, लोकांच्या भुवया लगेच उंचावतात. लग्न झालेय की नाही? सिंगल की कमिटेड? अशा प्रश्नांचा भडिमार सुरू होतो आणि जर या दोन्ही प्रश्नांची उत्तरे नकारार्थी असतील तर विचारूच नका. अशा ‘सिंगल’ असलेल्यांचे नेमके काय होते? त्यांना कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागते? हे दाखवणारा ‘सिंगल’ हा चित्रपट 27 ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. लालचुटूक हृदय दर्शवणारे चित्रपटाचे आकर्षक पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शक चेतन चावडा आणि सागर पाठक आहेत मात्र चित्रपटातील कलाकारांची नावे अजून गुलदस्त्यात आहेत. तरुण प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा असी ‘सिंगल’ हा चित्रपट असून ‘सिंगल’ असलेल्या आणि नसलेल्या प्रत्येकाला हा चित्रपट धमाल अनुभव देईल, असा विश्वास दिग्दर्शक व्यक्त करतात. किरण काशीनाथ कुमावत, हर्षवर्धन गायकवाड, शरद पाटील, अमोल कागणे, गौरी सागर पाठक हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.