शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश, मुलुंड-ठाणेदरम्यान नवे ठाणे स्टेशन

मुलुंड व ठाणेदरम्यान नवे ठाणे स्टेशन उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ठाण्याच्या मनोरुग्णालयाची जागा कुणालाही हस्तांतरित करू नये हा स्थगिती आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने तब्बल आठ वर्षांनंतर मागे घेतला. त्यामुळे मनोरुग्णालयाच्या 14.83 एकर जागेवर या नव्या ठाणे स्टेशनच्या उभारणीला आता वेग येणार असून ठाणे व मुलुंड रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांचा भार कमी होणार आहे. शिवसेना खासदार राजन विचारे यांच्यासह लोकप्रतिनिधींनी या रेल्वे स्थानकासाठी पाठपुरावा केला होता.