
बृहन्मुंबई गुजराती समाज आणि महाराष्ट्रातील गुजराती समाज महामंडळाचे अध्यक्ष वरिष्ठ पत्रकार हेमराज शाह यांच्या नावे एका नव्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. ‘साधनानू सत्यता’ या त्यांच्या पुस्तकाचा एकाच व्यक्तीबद्दल अधिकाधिक आर्टिकल्सचा समावेश केल्यामुळे जागतिक विक्रमामध्ये समावेश करण्यात आला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. सदर पुस्तकामध्ये साहित्य, पत्रकारिता आणि अन्य गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. नुकताच ‘सर्वात तरुण संपादक’ म्हणून त्यांचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सन्मानदेखील करण्यात आला होता. हेमराज शाह यांचा विविध साहित्य, सांस्कृतिक आणि कल्याणकारी संस्थांशी जवळचा संबंध आहे.

























































