
नववर्ष म्हटलं की नवे संकल्प, नवे विचार आणि नवी दिनदर्शिका आलीच. वर्षभराचे नियोजन करण्याबरेबरच सणसमारंभ, मुहूर्त पाहण्यासाठी उपयोगी पडणारी नवीकोरी दिनदर्शिका नववर्षाच्या पहिल्याच दिवशी घराघरात अणली जाते. त्यासाठी विविध सामाजिक संस्था, संघटनांकडून दिनदर्शिका तयार करण्यात आल्या असून मान्यवरांच्या हस्ते त्यांचे प्रकाशन करण्यात आले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी 2021च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. ही दिनदर्शिका प्रभाग समिती अध्यक्षा सुजाता पाटेकर यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आली आहे. याप्रसंगी शिवसेना नेते, उद्योग मंत्री सुभाष देसाई, शिवसेना सचिव – खासदार अनिल देसाई, शिवसेना सचिव-खासदार विनायक राऊत, विभागप्रमुख-आमदार विलास पोतनीस, मागाठाणे विधानसभा प्रमुख उदेश पाटेकर आणि उपविभागप्रमुख सुनील डहाळे आदी उपस्थित होते.
शिवसेनेचे विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड क्र. 28 चे नगरसेवक एकनाथ (शंकर) हुंडारे यांनी तयार केलेल्या 2021 दिनदर्शिकेचे प्रकाशन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विधानसभा संघटक संतोष राणे, नंदकुमार मोरे, संतोष धनावडे उपस्थित होते.
सुभाष डामरे मित्र मंडळ व शिवराज प्रतिष्ठान परळचे संस्थापक अध्यक्ष आनंद गावकर यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिका 2021चे प्रकाशन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. गोवा संपर्कप्रमुख जीवन कामत, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे चिटणीस आनंद गावकर, दिशांत पवारआदी उपस्थित होते.




























































