नवे वर्ष नवी दिनदर्शिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नव्या वर्षांची चाहूल लागताच घराघरांत वेध लागतात ते नववर्षांच्या दिनदर्शिकेचे. दरवर्षी मोठय़ा प्रमाणात सामाजिक संस्था आणि संघटना लोकसेवेसाठी मोफत दिनदर्शिकेचे वाटप करतात. सामाजिक बांधिलकीचा हा वसा यंदाही अनेकांनी कायम ठेवला असून मुंबईतील विविध संस्था आणि संघटनेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन नुकतेच करण्यात आले.

शिवशाही प्रतिष्ठानाच्या वतीने संस्थापक, अध्यक्ष माजी शाखाप्रमुख सुरेश काळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिवशाही दिनदर्शिका 2021चे प्रकाशन राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले.

युवासेना प्रमुख, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते युवासेना सहसचिव योगेश पेडणेकर यांनी तयार केलेल्या दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले, त्यावेळी विभाग युवाअधिकारी विजय पुरपुटे,भारतीय विद्यार्थी सेनेचे विभाग संघटक निलेश पोहकर हे उपस्थित होते.

मुंबइच्या माजी महापौर श्रद्धा जाधव आणि युवा सेनेचे पवन जाधव यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या दिनदर्शिका 2021चे प्रकाशन पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडले.