नववर्षाच्या पहिल्याच शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांची नांदी

नववर्षाच्या पहिल्याच शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांची नांदी पाहायला मिळणार आहे. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई यांचा संघर्षमय प्रवास दाखवणारा ‘सत्यशोधक’ या चित्रपटासह माधुरी दीक्षित प्रस्तुत ‘पंचक’ आणि नाना पाटेकर यांचा ‘ओले ओले’ हे चित्रपट येत्या 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहेत.

समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाची वाट दाखवणारे महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची संघर्षमय गाथा ‘सत्यशोधक’ चित्रपटातून उलगडणार आहे. चित्रपटात जोतिबांच्या भूमिकेतील संदीप कुलकर्णी तर सावित्रीमाईंच्या भूमिकेत राजश्री देशपांडे झळकणार आहे. ‘पंचक’ या चित्रपटात खोतांच्या घराला लागलेले ‘पंचक’ कसे सुटणार, हे पाहायला मिळणार आहे. जयंत जठार, राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटात आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर अशी तगडी स्टारकास्ट आहे. तर नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे ही जोडी ‘ओले ओले’ या चित्रपटातून भेटीला येणार आहे. सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीव यांच्याही भूमिका आहेत.