
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टीकनुसार न्यूयॉर्क हे जगातील सर्वात महागडे शहर ठरले आहे. तर ढाका हे जगातील सर्वात स्वस्त शहर ठरले आहे. जगातील दहा महागड्या शहरांपैकी सात शहरे एकट्या अमेरीकेतील आहेत. तर मुंबई हे हिंदुस्थानातील सर्वात महागडे शहर आहे.
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टीकनुसार, सर्वात महाग घरभाडे न्यूयॉर्क शहराचे आहे. अमेरीकेतील एका बेडरुम अपार्टमेण्टचे 3 लाख 14 हजार 322 रुपये महिन्याला घरभाडे आहे. या यादीत सिंगापूरचा दुसऱ्या क्रमांक लागतो. तर न्यूयॉर्कबरोबरच सॅन फ्रॅन्सिको, ब्रुकलिन, बोस्टन, सॅन डिएगो, मियामी आणि सॅन होजे यांचा समावेश आहे. याशिवाय टॉप 10 शहरांमध्ये बरमूडाच्या हॅमिल्टन आणि जर्मनीतील ज्युरिखचा समावेश आहे. जगातील 13 शहरांमध्ये वन बेडरुम अपार्टमेण्टचे मासीक भाडे 2 लाख 7 हजार 391 रुपयांहून अधिक आहे. यामध्ये जॉर्ज टाऊन, लॉस एंजिलिस आणि लंडनचा समावेश आहे. तर लंडनमध्ये वन बेडरुम अपार्टमेण्टचे मासीक भाडे 2 लाख 16 हजार 848 रूपये आहे. हाँगकाँगमध्ये 1 लाख 88 हजार 643 रुपये, डबलिनमध्ये 1 लाख 75 हजार 951 रुपये, सिडनीमध्ये 1 लाख 75 हजार 370 रुपये, दुबईमध्ये 1 लाख 63 हजार 922 रुपये, पॅरिसमध्ये 1 लाख 17 हजार 051 रुपये, टोकियोमध्ये 80 हजार 799 रुपये आणि शंघायमध्ये 77 हजार 149 रुपये आहे.
1 bedroom apartment monthly rent (city center):
1. 🇺🇸 New York: $3,789
2. 🇸🇬 Singapore: $3,454
3. 🇺🇸 San Francisco: $3,276
4. 🇺🇸 Brooklyn: $3,212
5. 🇧🇲 Hamilton: $3,200
6. 🇺🇸 Boston: $3,042
7. 🇺🇸 San Diego: $2,963
8. 🇨🇭 Zurich: $2,837
9. 🇺🇸 Miami: $2,761
10. 🇺🇸 San Jose: $2,728…— World of Statistics (@stats_feed) August 12, 2023
हिंदुस्थानची राजधानी असलेल्या मुंबईत एका बेडरुम फ्लॅटचे मासिक भाडे 47 हजार 285 रुपये एवढे आहे. भाड्याचा विचार केला तर मुंबई देशातील महागडे शहर आहे. मात्र जगात महागड्या शहरांमध्ये मुंबईचा 351 वा नंबर आहे. तर दिल्लीत वन बेडरुम फ्लॅटची किंमती मुंबईतील फ्लॅटच्या किंमतीच्या अर्धी आहे. दिल्लीत 20 हजार 324 रुपये मासिक घरभाडे आहे. तर पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये 12 हजार 609 ढाकामध्ये 11 हजार 199 रुपये घरभाडे आहे.

























































