पुढच्या वर्षी कोरोना संपणार, डब्ल्यूएचओची खूशखबर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 मागील जवळपास दोन वर्षे अख्ख्या जगाला वेठीस धरणारी कोरोना महामारी 2022 पर्यंत पूर्णपणे नष्ट होईल, अशी मोठी खूशखबर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिली आहे. पुरेसे लसीकरण आणि अॅण्टी व्हायरल गोळ्यांची उपलब्धता या शस्त्रांच्या जोरावर जग कोरोना लढा जिंकेल, पुढच्या वर्षांत महामारीमुक्त होईल, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

‘डब्ल्यूएचओ’च्या 100 हून अधिक शास्त्रज्ञांनी हे महत्त्वाचे भाकीत एका अहवालात केले आहे. ‘डब्ल्यूएचओ’चे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसस यांनी महामारी संपवण्यासाठी मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग या कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करावे, असे म्हटले आहे.

नव्या वर्षात हे चमत्कार दिसतील…

कोरोनाबळींचा आकडा शून्यावर येईल.

 कोरोना समूळ नष्ट होणार नाही, पण महामारी संपेल.

नव्या वर्षात महामारी सर्दी-तापासारखी असेल.

पुढच्या 3-4 महिन्यांत शेकडो औषधे येतील.

 99 टक्के रुग्ण घरीच बरे होतील.

 आजारी लोक वगळता जग मास्कमुक्त होईल.