आता निक किर्गिओसची अमेरिकन ओपनमधून माघार

409

कोरोनामुळे  युरोपमधील मानाच्या स्पर्धा फुटबॉल स्पर्धा सुरू झाल्यात,पण त्याही प्रेक्षकांविना. आता टेनिस विश्व रुळावर येण्याचा प्रयत्न करीत आहे, पण या स्पर्धांमध्ये खेळण्याचे धैर्य काही खेळाडूंना होत नाही.

31 ऑगस्टपासून अमेरिकन ही महत्त्वाची ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा खेळवण्यात येणार आहे, पण या स्पर्धेमधील खेळाडूंचा सहभाग अद्याप निश्चितझालेला नाही. महिला विभागातील नंबर वन टेनिसपटू ऍश्ले बार्टी हिने अमेरिकनओपन स्पर्धेमधून माघार घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्याच निक किर्गिओस यानेही या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. निक किर्गिओसयावेळी म्हणाला,‘‘डिअर टेनिस, मला या वर्षी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत खेळता येणार नाही. माझ्या ऑस्ट्रेलियातील देशवासीयांसाठी स्पर्धेबाहेर राहण्याचा निर्णय घेतोय.’’ अमेरिकेत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांना मी श्रद्धांजली वाहतो असे भावुक उद्गारही त्याने काढले.

आपली प्रतिक्रिया द्या